Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

‘ॲडव्हांटेज दोडामार्ग’ – मराठा समाजाचा मेळावा १३ एप्रिल रोजी होणार.!

दोडामार्ग : अखिल भारतीय मराठा महासंघ दोडामार्ग आणि सिंधू विकास संशोधन व कौशल्य विकास संस्था, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता महाराजा हॉल दोडामार्ग या ठिकाणी ‘ॲडव्हांटेज दोडामार्ग’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती महालक्ष्मी हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेत मराठा महासंघाचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष उदय पास्ते यांनी दिली.

‘ॲडव्हांटेज दोडामार्ग’ या उपक्रमात महाराष्ट्र नॉलेज फाउंडेशनचे माजी सल्लागार डॉ. सतीश कारंडे, पर्यावरण कायदे विषयक तज्ज्ञ ॲड. उमा सावंत, आर्किटेक विषय- जुनी बांधकाम विषयी श्रीमती तलुल्ला डिसिल्वा, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. राजेंद्र केरकर, संचालक कॉनबॅक विषय – बांबू-  मोहन होडावडेकर, संचालक सामंतक संस्था विषय – काजू व बांबू प्रक्रिया सचिन देसाई हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच दोडामार्ग तालुक्यातील विविध क्षेत्रातील महनिय व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. आगामी काळात दोडामार्ग तालुका कशाप्रकारे तालुका वासियांना आवश्यक आहे त्याची रूपरेषा ठरवण्यात येणार असून या कार्यक्रमात काजू, बांबू, उद्योग, व्यवसाय, पर्यटन आदीबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेत मराठा महासंघ सचिव भूषण सावंत, खजिनदार संदीप घाडी, सहसचिव सुशांत गवस, सहखजिनदार गोपाळ माजीक, भेडशी विभाग संघ अध्यक्ष अंकुश गवस, सदस्य प्रसाद रेडकर, मराठा व्यापारी संघटना अध्यक्ष सुदेश मुळीक, मराठा व्यापारी सचिव प्रदीप गावडे, वैभव इनामदार, पुनाजी गवस आदी मराठा बांधव उपस्थित होते.

ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles