सोलापूर : सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात विजेचा धक्का बसल्याने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राजनंदिनी अणय कांबळे असे मरण पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. शहरातल्या कोनापुरे चाळ परिसरात काल (8 एप्रिल) रात्री 9च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, काल (8 एप्रिल) संध्याकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे विजेची तार तुटून लोखंडी जिन्यात विद्युत प्रवाह उतरला. या लोखंडी जिन्याला स्पर्श झाल्याने राजनंदिनी हिला विजेचा तीव्र झटका बसल्याने ती जागीच बेशुद्ध झाली. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप या परिसरातील नागरिक करताय. त्यामुळे नागरिकांनी संतप्त होत या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे.
हे.