सावंतवाडी : येथील राजे प्रतिष्ठान कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयाला खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू, शिवप्रेमी जाकीर कुरेशी यांनी भेट दिली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग ऑफिसतर्फे तो साजरा करण्यात आला.
यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. ऑफिसला भेट दिल्यानंतर आपल्या भाषणात श्री. कुरेशी यांनी सांगितले की, मी खूप आनंदी व समाधानी झालो आहे. आपला वाढदिवस साजरा करून मला शुभेच्छा दिल्याबद्दल जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांचे त्यांनी विशेष आभार मानले. श्रीमंत उदयनराजे यान ऑफिसमध्ये घेऊन येऊ असेही ते म्हणाले. तसेच आपल्या सिंधुदुर्ग संघटनेचे काम खूप चांगले आहे, अशी त्यांनी कामाची पोचपावती दिली. तसेच राजे प्रतिष्ठान जिल्हा संपर्कप्रमुख शिवा गावडे यांचाही वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सदस्य प्रा. डॉ. रमाकांत गावडे यांनी केले. जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांनी आभार मानले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख शिवा गावडे, सिंधुदुर्ग सदस्य रमाकांत गावडे, तालुका अध्यक्ष संचिता गावडे, खजिनदार दर्शना राणे, शहर अध्यक्ष सेजल पेडणेकर, प्रणित सावंत, संदीप सुकी, संजय लाड, शिवराज तळवणेकर, राजन, समृद्धी आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
ADVT –





