Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

अभिमानास्पद .! – बयाजी बुराण प्रतिष्ठित ‘क्रीडादूत’ पुरस्काराने सन्मानित.!

कणकवली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने कणकवली तालुक्यामध्ये सलग १५ वर्ष ‘क्रीडा समन्वयक’ हे पद यशस्वीरित्या सांभाळणारे व क्रीडा क्षेत्राला एका अमूल्य झळाळी देणारे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूलचे क्रीडा शिक्षक बयाजी बुराण यांना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते ‘क्रीडादूत’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, लिपिक सुरेख व सर्व तालुक्यांचे समन्वयक उपस्थित होते.

कणकवली तालुका क्रीडा समन्वयक म्हणून २०११ पासून सलग १५ वर्षे क्रीडा समन्वयक म्हणून भरीव योगदान दिल्याबद्दल आणि जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासात दिलेले महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल क्रीडादूत या पुरस्काराने सन्मानित केले आहे. बुराण सर आहेत म्हणजे कोणतीही स्पर्धा यशस्वी होणारचं असा आपल्या कार्यकर्तुत्वाचा अलौकिक ठसा त्यांनी उमटवला. त्यांच्या अतुलनीय मार्गदर्शनामुळे कनेडी हायस्कूलमधील अनेक विद्यार्थ्यांनी केवळ राज्यचं नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर सुद्धा मेडल्स मिळवून यश प्राप्त केले आहे. त्यामुळेचं या क्रीडादूत पुरस्काराचे ते खरे मानकरी ठरतातं.
या पुरस्काराबद्दल श्री. बयाजी बुराण यांचे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ , मुंबईचे अध्यक्ष सतीश सावंत व सर्व संचालक मंडळ तसेच शालेय समिती चेअरमन श्री आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक/ प्राचार्य श्री. सुमंत दळवी, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles