कळसुलकरच्या योगी लेले यांस डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत सिल्वर मेडल प्राप्त.!

सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय,सावंतवाडी. या प्रशालेमध्ये इयत्ता सहावी मध्ये शिकत असलेला कुमार योगी मेघनाथ लेले याला बृहन्मुंबई अध्यापक मंडळ,मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा-2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता या परीक्षेत चारही टप्पे यशस्वीरित्या पार करत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल सिल्वर मेडल प्रदान करण्यात आले . या यशाने प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

कु.योगी लेले व मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती एस.यु.बांदेलकर यांचे या यशाबद्दल सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेशजी पई, सचिव श्री प्रसाद नार्वेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस व्ही भुरे, संचालक मंडळ, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर,शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी वृंद,पालक, प्रशालेचे हितचिंतक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

ADVT –

डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles