धुळे : तालुक्यातील नगाव गावातील रहिवाशी श्री. दीपक व समाधान कन्हैयालाल पाटील यांचे पिताश्री, कन्हैयालाल चिंतामण पाटील (वय ८५) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. कै. कन्हैयालाल पाटील यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ठिक ४ वाजता नगाव येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुलगे, ३ मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कै. अण्णांना ‘सत्यार्थ’ न्यूज चॅनेलच्या टीमकडून भावपूर्ण आदरांजली.!


