Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

‘ज्ञानदीप’ चे जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर !

सावंतवाडी : येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे सन २०२५ चे जिल्हास्तरीय मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदाचं हे १९ व वर्ष असून जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, पत्रकारिता, कला, संगीत, क्रीडा, कृषी, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हे मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. संस्थापक अध्यक्ष वाय.पी. नाईक यांनी हे पुरस्कार जाहीर केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली १९ वर्ष विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. निवड समितीने जावेद शेख यांच्या अध्यक्षतेखाली यंदाचे पुरस्कार जाहीर केलेत‌. जिल्ह्यातून आलेल्या विविध पुरस्कारांची छाननी करण्यात आली.

हे ठरले पुरस्कारार्थी –

अभियांत्रिकी तंत्रज्ञान क्षेत्रातील कार्यासाठी सचिन वंजारी (कणकवली), पाठ्यपुस्तक निर्मिती, शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल राजाराम फर्जंद (दोडामार्ग), कला-शैक्षणिक क्षेत्र मंदार चोरगे (वैभववाडी), शैक्षणिक क्षेत्र शैलेश तांबे (वेंगुर्ला), क्रीडा- शैक्षणिक क्षेत्र रोहन पाटील (दाणोली-सावंतवाडी), शैक्षणिक क्षेत्र सौ.शुभेच्छा सावंत (बांदा-सावंतवाडी), कला-संस्कृती क्षेत्र अविनाश म्हापणकर (सावंतवाडी), क्रीडा क्षेत्र कांचन उपरकर (सावंतवाडी), शैक्षणिक क्षेत्र राजेश कदम (देवगड), साहित्यक्षेत्र कवयित्री स्नेहा कदम (माणगांव-कुडाळ) यांना यंदाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

यावेळी निवड समितीचे अध्यक्ष एस.आर. मांगले, संस्थापक वाय. पी. नाईक, अध्यक्ष जावेद शेख, कार्याध्यक्ष निलेश पारकर, सहसचिव विनायक गांवस, मंडळाचे सदस्य भरत गावडे, एस.पी. कुलकर्णी, पी.बी. बागुल, सुनिल नेवगी, रेश्मा भाईडकर, श्रद्धा सावंत, वैभव केंकरे, नागेश कदम, प्रदीप सावंत, व्ही.टी.देवण, एस.जी. साळगावकर आदी उपस्थित होते. या पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, शाल, श्रीफळ सन्मानचिन्ह व मानपत्र असून हे पुरस्कार एस.आर.मांगले, आर.व्ही.नारकर, रेश्मा राजन भाईडकर, स्वप्नेश परब, व्ही.टी. देवण यांनी पुरस्कृत केले आहेत. लवकरच पुरस्कार प्राप्त मान्यवरांना मंडळातर्फे गौरविण्यात येणार आहे.

ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles