वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यावतीने शैक्षणिक विषयावर घेण्यात आलेल्या व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत वेंगर्ला तालुकास्तरावर रेडी येथील विद्या विकास एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित, मातोश्री पार्वती राऊत विद्यालयातील उपक्रमशील शिक्षिका नाझिया निसार अत्तार शेख हिने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला. पारितोषिक वितरण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग येथे झाले. यावेळी सन्मानचिन्ह, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. विनय राऊत, संस्थेच्या प्रभारी सी.ई.ओ. डॉ. अनघा राऊत, शाळेचे मुख्य सल्लागार मधुकर मेस्त्री, शाळेच्या मुख्याध्यापिका गीता विल्सन व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
नाझिया शेख ह्या आजगाव येथील विद्या विकास अध्यापक विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. आजगाव अध्यापक विद्यालायकडूनही त्यांचे विशेष अभिनदन करण्यात आले.
ADVT –
📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇
डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!


