वैभववाडी : आमदार नितेश राणे यांच्या ‘तुमचा लाडका आमदार तुमच्या दारी’ उपक्रमांस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वैभववाडी तालुक्यातील गावच्या गाव भेट दौरा काल संपन्न झाला. यावेळी अनेक जणांना आमदार नितेश राणे आणि त्यांच्या कार्याची झलक दिसून आली.

कोणतीही भाषणबाजी न करता त्या त्या गावातील कार्यकर्त्यांनी आमदारांनी केलेल्या विकास कामांचा पाढाच वाचून दाखवला. कोणतीही वाडी शिल्लक नव्हती तिथे आमदारांनी विकास काम केले नाही. लोक आणि इतर नेतेही मंत्रमुग्ध होऊन ऐकतच राहिले. वास्तविक आमदारांच्या गाव भेट दौऱ्यांमध्ये कोणती तक्रार येते का? कुठे विकास काम राहिलं तर नाही ना? असे प्रश्न लोकांकडून अपेक्षित असतात परंतु कणकवलीचा आमदार कामगिरी दमदारच होती. आमदारांनी स्वतःच लोकांमध्ये जाऊन त्यांना आवाहन केले की अजूनही मी कुठे कमी पडतोय का? कार्यकर्त्यांना कोणती अडचण येते का? अजून कुठल्या वाडी वस्तीवर विकास व्हायचा राहिलाय का पक्ष संघटना म्हणून आपण कुठे कमी पडतोय का असे सर्व प्रश्न विचारले. मुळातच जनतेत जाऊन असे प्रश्न विचारण्याची हिंमत महाराष्ट्रातला कुठलाही आमदार करेल असे वाटत नाही कारण कामांमध्ये इतकी तत्परता आणि अचूकता नितेश राणे कडेच असल्याने तेच अशी हिम्मत करू शकतात..
नितेश राणे यांच्या गाव भेट दौऱ्या दरम्यान विकास कामांची अधिकाधिक मागणी करण्याची विनंती ग्रामस्थाना करताना दिसतात. गाव भेट दौरा म्हणजे नक्की काय? तर आमदाराने आपल्या विकास कामांचा घेतलेला आढावा, मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी असणारी कळकळ आणि कार्यकर्त्यांच्या असलेल्या भावना समजून घेणे होय.
आमदार नितेश राणेजी जनतेला अपेक्षित आहे ते करत आहात. गावा – गावातील महिलांनी रक्षाबंधन करीत आपला लाडका भाऊ भरघोस मताने विधानसभेवर पुन्हा एकदा जाईल याचे शिक्कामोर्तब केले.


