.मित्रहो,
“आपला जन्म कोणत्या जातीत आणि कोणत्या धर्मात व्हावा, हे आपल्या हाती नसतं.” मात्र आपण फक्त आपलं कर्म करत जावं, आणि आपल्या जगण्यातून सुगंध निर्माण करावा. कारण कोणताही माणूस आपल्या धर्माने नाही तर कर्माने मोठा होतो.! हे वाक्य सार्थ ठरवलं आहे ते स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे संस्थापक आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अण्णासाहेब रामकृष्णजी नेरकर यांनी..!
धुळे शहराला लागूनच असलेल्या गोंदूर सारख्या छोट्याशा गावात रामकृष्ण अण्णांचा जन्म झाला आणि सुरुवातीपासूनच प्रचंड मेहनतीने त्यांनी आज स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अण्णांनी शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाच त्यांनी आपल्या अंगी असलेले नेतृत्व गुण आणि विविध कौशल्यातून युवक चळवळीत स्वतःला झोकून दिले. आज मेघालय, मिझोरम या राज्याचे नेहरू युवा केंद्राचे संचालक असलेले आदरणीय अतुलजी निकम साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि आई-वडिलांच्या प्रेरणेने रामकृष्ण अण्णांनी नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवा संघटन आणि युवा कार्य प्रेरणा निर्माण केली. अनेक जिल्हे, राज्ये आणि राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय एकात्मता शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रीय अस्मितेचा जागर करत अण्णांनी युवकांसाठी भरीव योगदान दिले. मित्रहो, हा प्रवास अजिबात सोपा न होता. या खडतर प्रवासात अण्णांना गोंदूर ग्रामस्थ आणि मित्र परिवाराने फार मोठी साथ दिली.
महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यावर उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी संस्था असलेल्या श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेत ते शिक्षक म्हणून रुजू झाले. आपला शैक्षणिक प्रवास सुरू असतानाही रामकृष्ण अण्णांनी सामाजिक बांधिलकी सातत्याने जोपासली. गोंदूर आणि पंचक्रोशीतील अनेक युवकांसाठी त्यांनी विविध माध्यमातून मदत केली. पथनाट्य, राष्ट्रीय एकात्मता शिबीरे, रक्तदान चळवळ, पर्यावरण संरक्षण, युवकांना दिशा देणारी विविध शिबीरे असे उपक्रम राबवून अण्णांनी उत्तर महाराष्ट्रात स्वतःचा एक वेगळा विधायक कार्य करणारा मित्र गोतावळा निर्माण केला.
एका छोट्याशा खेड्या गावात सामान्य परिवारात जन्म घेऊन अण्णा नेहरू युवा केंद्राचे ‘आदर्श युवक” तर ठरलेच. शिवाय गोंदूरसारख्या अत्यंत विकासात्मक नावलौकिक असलेल्या गावाचे ते ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच पदापर्यंत पोहोचले. या सर्व प्रवासात अण्णांना समर्थ साथ दिली ती त्यांच्या भावंडांची आणि उच्च विद्या विभूषित असलेल्या, संस्कारांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या आदरणीय प्रज्ञा वहिनीसाहेब यांची.!
आज मनापासून अभिमान वाटतो. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म घेऊन आपले मार्गदर्शक अण्णासाहेब एका वेगळ्या यशोशिखरावर पोहोचले आहेत. आज अण्णांची लाडकी कन्या आणि आपली लाडकी भगिनी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. लवकरच ती डॉक्टर होणार आहे, हे आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानास्पद आहे. खरंतर अण्णांबद्दल खूप लिहिता येईल. कारण अण्णांचा संघर्ष, त्यांना छळणारे अनेक लोकं आणि त्या लोकांना पुरून उरणारे अण्णा. हे सगळं मी ‘ह्याची देहा याची डोळा’ अनुभवलं आहे. परंतु त्याबद्दल मी फारसं बोलणार नाही आणि लिहिणार नाही. कारण गीतेत सांगितल्याप्रमाणे आपण फक्त आपले चांगलं कर्म करत जावं. “कर्मण्ये वाधिकारस्ते मां फलेषु कदाचन..!” हेच वाक्य अण्णा यांच्या बाबतीत सार्थ ठरते.
आदरणीय अण्णासाहेब आपणांस वाढदिवसाच्या हृदयापासून शुभेच्छा…!
आदरणीय अण्णासाहेब,
“झेप अशी घ्या की, पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळही पाहत रहावा,
कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून,
यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा..!”
अण्णासाहेब आपले पुढील आयुष्य सुख, समृद्धी, भरभराटीचे आणि निरामय जावो, आपल्या हातून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रात अजून प्रेरणादायी कार्य घडो,
हिच आपल्या जिवलग मित्राची सदिच्छा,
स्नेह तर कायमचं, वृद्धीची अभिलाषा..!
- आपला स्नेही –
प्रा. रुपेश पाटील..
नगाव,
सावंतवाडी..
(स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ कोकण प्रदेशाध्यक्ष)