सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय,सावंतवाडी प्रशालेतील इयत्ता सहावी व सातवीतील विद्यार्थ्यांनी सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत घवघवीत यश मिळवून आपल्या प्रशालेच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये घेण्यात आलेली सिंधू रत्न टॅलेंट सर्च परीक्षा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर पालघर व ठाणे जिल्ह्यात दिनांक 2 फेब्रुवारी, 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती. कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या मधील इयत्ता सहावीतून कु.अवनी रामनाथ बावकर (166/20वी), कु.जिज्ञासा मधुकर देसाई(164/21वी) यांनी गोल्ड मेडल्स मिळविले, तर इयत्ता सातवीतून कु.प्रथमेश विलास सोनटक्के (148/18वा), कु.गार्गी राजेश परब (142/25वी), कु.दुर्वांक किशोर वालावलकर(140/29वा) यांनी या परीक्षेत सिल्वर मेडल्स मिळविले तसेच प्रशालेतील सहभागी विद्यार्थ्यांनी 12 ब्राँन्झ मेडल्स मिळवून देत प्रशालेच्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक श्री गोपाळ गवस व श्री पी.बी.बागुल यांचे संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई, सचिव प्रसाद नार्वेकर, संचालक मंडळ, मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर, शिक्षक वृंद, शिक्षकेतर वृंद, पालक प्रशालेचे हितचिंतक यांच्यावतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
ADVT –
डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!
📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇


