Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी पोर्टलवर करणे बंधनकारक.!

सिंधुदुर्गनगरी : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिनियमाचे कलम ४ अन्वये ज्या कार्यालयांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक कर्मचारी असतील अशा सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे.
तसेच सदरच्या आस्थापनेतील अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी SHE BOX PORTAL वर करणे बाबतचे निर्देश केंद्र शासनाकडून देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापना तसेच इंटरप्रायझेस इ. यांना आवाहन करण्यात येते की, ज्या आस्थापनांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक कर्मचारी असतील अशा सर्व आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समितीचे गठन करुन खाली नमूद केलेल्या कार्यपद्धतीचा वापर करून सदर समितीची नोंदणी SHE BOX PORTAL वर करण्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
SHE BOX PORTAL वर अंतर्गत तक्रार समिती नोंदविण्याची कार्यपद्धती- https://shebox.wcd.gov.in या वेबसाईट वर जा. private head office registration या tab वर click करा. आवश्यक त्या सर्व माहितीचा अचूक तपशील भरा. submit या tab वर click करून माहिती नोंदवा.
अधिक माहितीकरिता – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग प्रशासकीय इमारत, तळमजला, ए-ब्लॉक, ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे संपर्क साधावा. ई-मेल dwcdosdurg@gmail.com

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles