सावंतवाडी : पहलगाम (जम्मू काश्मीर) मध्ये निष्पाप हिंदू पर्यटकांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असून या घडलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करीत आहे,तुमचा धर्म कोणता असे विचारून हिंदू म्हणून सा़गितल्यावर गोळीबार करण्यात आला,आला प्रत्येक हिंदूने याचा गांभीर्याने विचार करुन हिंदू धर्म पाळत त्याच्यासाठीच जगूया व इतरांना न वाढवता हिंदू धर्म वाढूवया, हि च खरी मरण पावलेल्यांना श्रद्धांजली ठरेल, असे सकल हिंदू सामाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
काश्मिर पहेलगाम येथे गेलेल्या हिंदू पर्यटकांना टीपून त्यांना त्यांचा धर्म विचारून नंतर मारण्यात आले याचा प्रत्येक हिंदू ने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे,आपण कोणाकडून काय घेतो?काय देतो? कोणत्या रिक्षेत बसतो,कोणत्या हाॅटेलात खातो ते धर्म न विचारता नाव विचारून विचार करने गरजेचे आहे असे सीताराम गावडे यांनी म्हटले आहे.
आता प्रत्येक हिंदू ने जागा होऊन धर्म रक्षन करने काळाची गरज आहे,यासाठी युवा पिठीने पुढाकार घेत धर्म रक्षण व स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजेत असे मत सकल हिंदू सामाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून व्यक्त केले आहे.


