Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

मुलं, नातवंडं भारतीय, ‘ती’ मात्र पाकिस्तानी ! ; देश सोडण्यावरून शारदबाईंची पंचाईत.

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात कठोर निर्ण घेतले आहेत. भारताने व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडून जाण्यास सांगितलं आहे. तर पाकिस्तानी नागरिकांनाही भारतीय नागरिकांना त्यांचा देश सोडून जाण्यास सांगितलं आहे. दरम्यान या निर्णयानंतर भारतात वर्षानुवर्षे राहणाऱ्या काही लोकांची पंचाईत झाली आहे. यात भूवनेश्वर येथील शारदा उर्फ शारदा कुकरेजा यांचाही समावेश आहे.

लग्न झालं, 30 वर्षांपासून भारतात पण..

शारदा कुकरेजा या मूळच्या पाकिस्तानी नागरिक आहेत. मात्र गेल्या 30 वर्षांपासून त्या भारतात राहतात. साधारण 30 वर्षांपूर्वी त्यांचे एका भारतीय उद्योजकाशी लग्न झाले होते. तेव्हापासून त्या भारतात राहतात. सध्या त्यांना दोन आपत्यं आहेत. त्यांना एक नातू आणि एक नातदेखील आहे. पण अजूनही त्यांना भारतीय नागरिकता मिळू शकलेली नाही. भारताचे नागरिकत्त्व मिळावे म्हणून त्यांनी अर्ज केलेला आहे. मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असा त्यांचा दावा आहे. विशेष म्हणजे त्यांची मुलं आणि नातवंडांना भारतीय नागरिकता मिळालेली आहे.

…तर तुमच्यावर कारवाई होणार.!

शारदा यांच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे. पण व्हिसा नाही. गेल्या तीस वर्षांपासून त्या भारतात राहात असल्या तरी भारतीय नागरिकत्त्व नसल्यामुळे त्यांना देश सोडून जाण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच मुदत दिलेल्या तारखेच्या आत देश सोडून न गेल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही या नोटिशीत म्हणण्यात आलंय.

वडील 60 दिवसांसाठी आले अन्…

शारदा यांचे पूर्ण कुटुंब सध्या भारतात आहे. माझे पाकिस्तानमध्ये कोणीही ओळखीचे नाही, असा त्यांचा दावा आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या रिपोर्टनुसार शारदाबाई यांचा जन्म 1970 साली पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील सुक्कूर शहरात झाला. त्यांचे वडील 1987 साली लाँग टर्म व्हिसावर आपल्या सहा मुलांना घेऊन भारतात 60 दिवसांसाठी आले होते. नंतर ते ओडिसातील कोरापुट जिल्ह्यात स्थायिक झाले. शारदा यांचे लग्न बोलनगीर येथील एका उद्योजकाशी झाले. त्यांना एक मुलगा एक मुलगी आणि नातू-नात आहेत. हे सर्व भारतीय नागरिक आहेत. पण शारदाबाई यांना भारतीय नागरिकत्त्व मिळालेलं नाही.

शारदाबाई यांचे नेमके काय होणार?

दरम्यान, तुमच्याकडे लाँग टर्म व्हिसा नाही. तसेच भारतात राहू देण्यासाठी तुम्ही ‘अपवाद’ या श्रेणीतही येत नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर देश सोडावा अशी नोटीस त्यांना देण्यात आली आहे. शारदाबाई यांना मात्र भारत सोडून पाकिस्तानात जायचे नाही. मी जेव्हापासून भारतात आले तेव्हापासून मी या देशाला माझं मानलं आहे. मी अजून पाकिस्तानात कोणाशी बोललेलीही नाही, असं त्या सांगतात. दरम्यान, ओडिसा राज्यातून एकूण 12 पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडून जाण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे शारदाबाई यांचे नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

ADVT –

डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles