नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी सकाळी ( २२ एप्रिल २०२५ ) झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर या दहशतवाद्यांच्या मागे पाकिस्तानाच्या असलेल्या रोल संदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्णायक कारवाई सुरु केली आहे. भारताने परदेशी सरकारांच्या समोर तांत्रिक आणि मानवी खबऱ्यांबाबत मिळालेले गुप्तचर पुरावे सादर केले आहेत. यातून या मागे पाकिस्तानच्या अतिरेकी संघटनांचा थेट रोल असल्याचे पक्के पुरावे भारताने सादर केले आहेत.
पाकिस्तानी कनेक्शन उघड –
भारतीय तपास यंत्रणांनी या हल्ल्याला जबाबदार असलेल्या अतिरेक्यांची ओळख पटवली आहे. तपासात या हल्ल्यात सामील अतिरेक्यांचा थेट संबंध ‘द रेजिस्टेंस फ्रंट’ (TRF) बरोबर असल्याचे उघडकीस आले आहे. TRF ही संघटना लष्कर ए तैयबाशी संबंधित शाखा आहे. इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्समध्ये या अतिरेक्यांचे सिग्नल पाकिस्तानच्या दोन ठिकाणांशी जुळलेले आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी 13 राष्ट्राध्यक्षांशी साधला संवाद –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसातच अमेरिका, ब्रिटेन, फ्रान्स, जपान, इस्रायल, इटली, इजिप्त, जॉर्डन, सौदी अरब, नेपाळ, मॉरीशस, डच आणि ऑस्ट्रेलिया सारख्या १३ देशांच्या प्रमुखांशी संपर्क साधला आहे. सर्व नेत्यांनी या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध व्यक्त केला आहे. आणि भारताला पाठींबा दिला आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी देखील परराष्ट्र मंत्री आणि डिप्लोमेटीक अधिकाऱ्यांशी संवाद साधात भारताची बाजू मांडली आहे.
ADVT –
📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇


