सावंतवाडी : कोल्हापूर विभागात होमी भाभा परीक्षेत चमकणारे मिलाग्रियन युवा शास्त्रज्ञ चिदानंद चंद्रशेखर रेडकर यांनी रौप्य पदक पटकावले.
मुंबईतील माटुंगा येथे होमी भाभा पुरस्कार वितरण समारंभ नुकताच पार पडला.
इयत्ता ६ वी मध्ये शिकणाऱ्या मिलाग्रीस हायस्कूलचा हुशार विद्यार्थी चिदानंद चंद्रशेखर रेडकर यांनी यात रौप्य पदक मिळवले.
या समारंभ प्रसंगी विशेष अतिथी चिन्मय गवाणकर आणि उभय देसाई
विज्ञान शिक्षक संघटना (GBSTA) मंडळाचे मुंबई प्रतिनिधी यांनी चिदानंद रेडकर यांना प्रमाणपत्र आणि रौप्य पदक देऊन त्यांचा सत्कार केला.
डॉ. होमी भाभा परीक्षेच्या सर्व ४ स्तरांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
स्तर १ सिद्धांत, लेखी परीक्षा,
स्तर २ व्यावहारिक पात्रता,
स्तर ३ सामान्य मुलाखत,
स्तर ४ कृती संशोधन प्रकल्प आणि मुलाखत.
प्राचार्य रेव्हरंड फादर रिचर्ड सालदान्हा यांनी चिदानंदचे हार्दिक अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.