सावंतवाडी : येथील मुक्ताई अकॅडेमीने व्हिजन, मुंबई यांच्या सहकार्याने शालेय विदयार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या “आवाज व अभिनय” कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली, मालवण येथील पहीली ते दहावीतील तब्बल अठ्ठेचाळीस मुला-मुलींनी कार्यशाळेत सहभाग घेतला.चार दिवस चालणा-या या कार्यशाळेचे आयोजन सावंतवाडी येथील श्री.पंचम खेमराज महाविदयालयाच्या सभागृहात करण्यात आले.उदघाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त युवराज लखमराजे भोंसले यांच्या शुभहस्ते आणि प्रमुख पाहुणे बाबा वर्दम थिएटर्सचे कार्यवाह, अभिनेते, दिग्दर्शक श्री.केदार सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार श्री.गजानन नाईक, श्री.जयप्रकाश सावंत, कार्यशाळेचे मार्गदर्शक श्री.श्रीनिवास नार्वेकर आणि स्वरुपा सामंत, मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर, उपाध्यक्षा सौ.स्नेहा पेडणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
युवराज लखमराजे यांनी मुलांना शुभेच्छा देताना या उपक्रमाचा भविष्यात विविध ठिकाणी उपयोग होणार असल्याने मुलांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.तसेच मुक्ताई ॲकेडमी क्रिडा, अभिनय, नृत्य, संगीत, इत्यादी क्षेत्रात मुलांसाठी करत असलेल्या कार्याचे कौतुक केले.प्रमुख पाहुणे श्री.केदार सामंत यांनी बालनाट्य, एकांकिका या विषयी मुलांना मार्गदर्शन करताना मुक्ताई ॲकेडमीने सावंतवाडीत मुलांसाठी सुरु केलेल्या या चळवळीचे कौतुक केले.यापुढे मुक्ताई ॲकेडमीला बाबा वर्दम थिएटर्सचे सहकार्य राहील, अशी त्यांनी ग्वाही दिली.ज्येष्ठ पत्रकार श्री.गजानन नाईक यांनी मागील दहा वर्षातील ॲकेडमीचा प्रवास हा कौतुकास्पद असल्याचे सांगून मुलांना शुभेच्छा दिल्या.कार्यशाळेचे मार्गदर्शक श्री.श्रीनिवास नार्वेकर आणि स्वरुपा सामंत यांनी कार्यशाळेविषयी मार्गदर्शन करुन प्रशिक्षणाला सुरुवात केली.
यावेळी मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांनी मुलांसाठी यापुढे बालनाट्य, वादयवृंद, इत्यादी उपक्रम घेण्यात येतील असे सांगितले.सूत्रसंचालन ॲकेडमीचे विदयार्थी पवित्रा चिपकर आणि विभव राऊळ यांनी केले.आभार प्रदर्शन पवित्रा चिपकर हीने केले.
सावंतवाडीत ‘आवाज व अभिनय’ कार्यशाळेस शानदार सुरुवात! ; मुक्ताई अकॅडेमीचे आयोजन, व्हिजन मुंबई यांचे सहकार्य.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


