Sunday, June 22, 2025

Buy now

spot_img

जयंत पाटलांचे अर्चना घारे – परब यांना मालवणीतून रक्षाबंधनाच्या शुभेच्छापर आशीर्वाद.

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतदादा पाटील यांना रक्षाबंधन सणाला कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चनाताई घारे-परब यांनी राखी पाठवली होती‌. तुम्ही आठवणीने पाठयलेली तुतारी वाजवणारा माणूस ह्या आपल्या पक्षाचा चिन्ह असलेली राखी मिळाली. त्याबद्दल मी आपलो आभारी आसय.

ताई, रक्षाबंधनाच्या आणि तुझ्या फुडल्या राजकीय वाटचालीक माझाकडसून मनःपूर्वक शुभेच्छा. तसाच, आपल्या पक्षाच्या चिन्हाप्रमाणे तूझ्या आयुष्यात नेहमीच आनंदाची तुतारी वाजत रवांदे ह्याच देवा पाटेकराकडे गाऱ्हाणं ! असे पत्र जयंतदादा पाटील यांनी अर्चनाताई यांना पाठविले‌.

जयंतदादांनी, रक्षाबंधनाला पाठविलेल्या राखीला चक्क मालवणी भाषेतून* पत्र पाठवून शुभ आशीर्वाद दिले आहेत. या पत्रात आदरणीय जयंतदादा म्हणाले, तुम्ही आठवणीने पाठयलेली तुतारी वाजवणारा माणूस ह्या आपल्या पक्षाचा चिन्ह असलेली राखी मिळाली. त्याबद्दल मी आपलो आभारी आसय. रक्षाबंधनाच्या धाग्याप्रमाणेच आपलो ह्यो ऋणानुबंध असोच कायम रवतलो आणि अजून वृंध्दिगंत होतलो याबद्दल माझा मनात अजिबात शंका नाय. ताई, रक्षाबंधनाच्या आणि तुझ्या फुडल्या राजकीय वाटचालीक माझाकडसून मनःपूर्वक शुभेच्छा. तसाच, आपल्या पक्षाच्या चिन्हाप्रमाने तूझ्या आयुष्यात नेहमीच आनंदाची तुतारी वाजत रवांदे ह्याच देवा पाटेकराकडे गाऱ्हाणं…! अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय मा. जयंत पाटील साहेब यांनी व्यक्त करत कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे – परब यांचे आभार मानले.

रक्षाबंधन निमित्त सौ. अर्चना ताईंनी तुतारी वाजवणाऱ्या माणसाची राखी दादांना पोस्टाने पाठवली होती. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात हा उपक्रम ताईंनी राबविला होता. राखी म्हणजे विश्वास, राखी म्हणजे संकटात मदतीचा हात आणि शेवटपर्यतची साथ. दादा, द्याल ना तुमच्या या बहिणीला साथ ! असे आवाहन त्यांनी पत्राद्वारे करत लाडक्या भावासाठी राखी पाठवली होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्चनाताईंच्या या उपक्रमाला मालवणी भाषेतून शुभेच्छा देत त्यांना आशीर्वाद देत त्यांच्या संकल्पनेचे कौतुक केले आहे.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles