शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांच्या वाढदिवसाला शिवसैनिकांचा जल्लोष! ; शुभेच्छांचा वर्षाव, सामाजिक कार्याचा गौरव!

सावंतवाडी  : शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांचा वाढदिवस शिवसैनिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत जल्लोषपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पक्षनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक कार्यामुळे ओळख निर्माण केलेल्या दिनेश गावडे यांच्यावर यावेळी शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव झाला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिनेश गावडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याची, जनसंपर्काची आणि संघटन बळकट करण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. भविष्यातही त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे कार्य अधिक जोमाने पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या वाढदिवस सोहळ्याला तालुकाप्रमुख बबन राणे, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, रमाकांत राऊळ, आनंद वरक, संजय गावडे, स्वप्नील परब, नंदू गावडे, बबन गावडे, यश गावडे, परेश सोंसुरकर, देव्रत राऊळ, क्लेटस फर्नांडिस, वामन नार्वेकर, सचिन साटेलकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थितांनी दिनेश गावडे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच त्यांच्या पुढील सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या कार्याला अधिकाधिक यश लाभो, अशी सदिच्छा व्यक्त केली. संपूर्ण परिसर घोषणांनी आणि जल्लोषपूर्ण वातावरणाने दुमदुमून गेला, त्यामुळे हा वाढदिवस सोहळा शिवसैनिकांसाठी संस्मरणीय ठरला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles