Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

‘हम गया नही जिंदा है!’ योजना जनसेवेत अर्पण.

सोलापूर :  श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीचे अवचित साधून समर्थ नगरी प्रतिष्ठान अक्कलकोटच्या माध्यमातून स्वामी चरणी हम गया नही जिंदा है ! ही योजनेचा लोकार्पण सोहळा नुकताच अक्कलकोट येथे भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला .
अक्कलकोटसह राज्यभरामध्ये श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे व श्री स्वामीभक्त चोळपा महाराज यांचे वंशज अण्णू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामीनाम प्रसाराची सेवा या संस्थेच्या मार्फत केली जाते . श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी दिनानिमित्त मयत झालेल्या व्यक्तीच्या गरजवंत कुटुंबास अंत्यसंस्कार तथा आधार देण्याच्या संकल्पनेतून अक्कलकोटसह राज्यभरामध्ये ही योजना राबविण्याचे नियोजन या योजनेअंतर्गत करण्यात आले आहे .
योजनेचा लोकार्पण सोहळ संपन्न झाला .याप्रसंगी श्री स्वामीभक्त चोळाप्पा महाराज वंशज वे . शा. सं. अण्णू महाराज व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे प्रथमेश इंगळे ,पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे , मुख्याधिकारी रमाकांत डाके , प्रतिष्ठित व्यापारी बसवराज माशाळे , जेष्ठ बाबासाहेब निंबाळकर आदिची उपस्थीती होती .या योजनेअंतर्गत मयत झालेल्या व्यक्तीच्या गरजवंत कुटुंबास पाच हजार रुपये अंत्यसंस्कारसेवा तथा आधारनिधी म्हणून घेण्याचे नियोजन केले आहे . असे अण्णू महाराज यानी सांगीतले
सर्वसामान्यांना आधार देणारी योजना
वास्तविक पाहता गरजवंतापर्यंत पोहोचणारी योजना खूप महत्त्वाची आहे . समर्थ नगरी परिवाराच्या माध्यमातून हम गया नही जिंदा है !
ही योजना योग्य गरजवंत सर्वसामान्याना आधार देणारी योजना ठरेल . असं उद्गार राजेंद्र टाकणे , पोलीस निरीक्षक , उत्तर पोलीस ठाणे अक्कलकोट यांनी काढले
ही योजना गरजवंताना लाभदायी व दानशूरांना वरदायी ठरणारी आहे . पुढील काळात राज्यभरामध्ये उदयास येईल असा विश्वास .
प्रथमेश इंगळे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट यांनी व्यक्त केला
याप्रसंगी सिद्राम वाघमोडे, भीमराव धडके , चंद्रप्रकाश उदगिरी , नंदकुमार जगदाळे , सुभाष तारापुरे , कुमार पतंगे , शेखर आडवीतोटे , श्रीकांत झिपरे ,संजय पडनुरे , सुनिल होटकर , सुखदा ग्रामोपाध्ये , अश्विनी शिंपी , कावेरी धरणे , सुवर्ण इंगळे त्याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन राणे, अतुल नाईक, प्रशांत परब आणि प्रा वैभव खानोलकर आधी स्वामीभक्त उपस्थित होते .

ADVT

 

खुशखबर ..! – आंबोलीत ‘साप्ताहिक साहसी आणि नेतृत्व विकास शिबीर’. ; The Colonel’s Academy for Adventure & Aero sports आणि सैनिक स्कूल आंबोलीचे संयुक्त आयोजन. ..

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles