सावंतवाडी : येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेच्या इयत्ता पहिली व दुसरी च्या विद्यार्थ्यांनी गुरुकुल टॅलेंट प्रज्ञाशोध परीक्षा- 2025 मध्ये राज्य, जिल्हा तथा तालुकास्तरावर विविध पदके प्राप्त करीत शाळेचे नाव उज्वल केले आहे. इयत्ता पहिली व दुसरी चा शंभर टक्के निकाल लागला असून 48 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या या कौतुकाबद्दल संस्थाध्यक्ष श्री शैलेश पई,सचिव डॉक्टर प्रसाद नार्वेकर, इतर संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री सावंत सर, सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले.यातील दुसरीच्या मुलांना श्रीमती ज्योत्स्ना गुंजाळ व प्राची बिले यांनी तर पहिलीच्या विद्यार्थ्यांना श्रीमती स्वरा राऊळ व स्मिता घाडीगावकर यांनी मार्गदर्शन केले.
पदक धारक विद्यार्थी पुढील प्रमाणे –
राज्यस्तरावरील यशवंत विद्यार्थी –
स्वरांग गावडे – 100% – राज्यात प्रथम,ऋग्वेद रणशूर – 98% – राज्यात द्वितीय,आयुष लुष्टे – 98% – राज्यात द्वितीय,वेदांत गिरप – 96% – राज्यात तृतीय,आर्यन बोळेगावे – 96% – राज्यात तृतीय, स्वराली पांगम – 92% – राज्यात पाचवा.
जिल्हास्तरावरील यशवंत विद्यार्थी –
साईशा देसाई – 90% – जिल्ह्यात प्रथम,ईश्वरी मोर्ये – 90% – जिल्ह्यात प्रथम,स्वरा राऊळ – 90% – जिल्ह्यात प्रथम,अर्चना सावंत – 88% – जिल्ह्यात द्वितीय,वेदांश कदम – 88% – जिल्ह्यात द्वितीय,दुर्वा कानसे – 86% – जिल्ह्यात तृतीय,रिद्धी परब – 86% – जिल्ह्यात तृतीय,प्रांजली सोनटक्के – 86% – जिल्ह्यात तृतीय,दिक्षा टिळवे – 84% – जिल्ह्यात चौथा,तनिष नाईक – 82% – जिल्ह्यात पाचवा,दर्श पडते-88%-जिल्ह्यात दुसरा
प्रत्युष जाधव-82%-जिल्ह्यात पाचवा,श्राव्या परब-82%-जिल्ह्यात पाचवी
तालुकास्तरावरील यश-परी जाधव – 80% – तालुक्यात प्रथम,परिधी कोयंडे – 80% – तालुक्यात द्वितीय,हर्ष लातये – 72% – तालुक्यात 11वा ,सुखम करमळकर – 72% – तालुक्यात 12 वा ,गंधर्व नाईक-78%- तालुक्यात चौथा
श्रीकृष्ण बांदेकर -78%-तालुक्यात सहावा,युगराज सावरवाडकर -78%-तालुक्यात सातवा
हिमानी कोलगावकर-78% -तालुक्यात आठवी,आयुष जाधव -76%-तालुक्यात नववा, उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनीही उज्ज्वल कामगिरी करत उत्तम गुण मिळवले आहेत. यशवंत विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
ADVT –
📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇


