संजय पिळणकर
वेंगुर्ला : आगार वाहतूक निरीक्षक आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांच्या मनमानी आणि हुकूमशाही कारभाराविरोधात सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने महाराष्ट्र दिनी दी १ मे पासून वेंगुर्ला आगाराबाहेर आमरण उपोषण सुरू केले असून आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे.
दरम्यान यापूर्वी ह्याच अधिकाऱ्यांच्या हुकूमशाही विरोधात सेवाशक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाने दी २६ जानेवारी २०२५ रोजी उपोषण केले होते.त्यावेळी आगारप्रमुख,वेंगुर्ला तहसीलदार, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन एस टी कर्मचाऱ्यांना दिले होते.मात्र तब्बल तीन महिने उलटूनही मुजोर प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने किंवा लेखी स्वरूपात पत्र न दिल्याने एस टी कर्मचारी संघाने कामगार दिनी दी १ मे पासून पुन्हा आमरण उपोषण सुरु केले.


