सिंधुदुर्ग : मालवण शहरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार दिनांक ११ मे रोजी दुपारी १२.३० ते १.३० या दरम्यान दर्शन घेणार आहे. यावेळी मंत्रिमंडळातील इतर मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. पुतळा दर्शन नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी २ वाजता कणकवली तालुक्यातील करंजे येथील कै. तातू सिताराम राणे संचलित गोवर्धन गो शाळेचे उद्घाटन करणार आहेत.
पुतळा उभारणी विषयी
उभारण्याच्या कामास सार्वजनिक बांधकाम विभागाने ३१ कोटी ७५ लाख रकमेस प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. त्यानुसार विभागाने या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून मे.राम सुतार आर्ट्स क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीस कामाचे कार्यादेश निर्गमित केलेले आहेत. पुतळा उभारण्याचे काम ईपीसी तत्त्वावर झालेले आहे. तलवारधारी पुतळ्याची उंची ६० फूट इतकी असून संपूर्ण पुतळा ब्राँझ धातूमध्ये उभारण्यात येत आहे. पुतळ्याच्या आधारासाठी स्टेनलेस स्टील सपोर्ट फ्रेमवर्क करण्यात येत आहे . तसेच चौथऱ्यासाठी M50 या उच्च दर्जाचे काँक्रीट व स्टेनलेस स्टील सळईचा वापर करण्यात आलेला आहे. या पुतळ्याचे संकल्पन आयआयटी मुंबई या तज्ञ संस्थेकडून तपासून घेण्यात आलेले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ११ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर. ; राजकोट येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे घेणार दर्शन ! ; कणकवली – करंजे येथील गोवर्धन गो शाळेचेही मुख्यमंत्री करणार उद्घाटन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


