मळेवाड : मळेवाड चराटकर वाडी ते आजगाव (सावरदेव देवस्थान) पर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली होती. वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत होती.त्यात करून या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात घडत होते.
अक्षरशः या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन वाहनचालकांना प्रवास करावा लागत होता. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची संबंधित विभाग वाट पाहत आहेत काय? असा संतप्त सवाल वाहनधारक,पादचारी करत होते.
त्यात करून सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यात बरेच पर्यटक ये – जा करत असतात..मात्र त्यांना या खड्डेयुक्त रस्त्याचा सामना करूनच पुढे जावं लागतं होत.त्यात करून एखादा इमर्जन्सी पेशंट इतरत्र न्यायचा असेल तर त्याचा त्रास पेशंटला मोठ्या प्रमाणात होत होता.
त्यामुळे या खड्डे युक्त रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावे अशी मागणी,वाहनचालक,पादचारी , ग्रामस्थ करत होते.
सदरील रस्त्यावरील खड्डे सध्या बुजविण्याचे काम तसेच रस्त्याचे डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.त्यामुळे वाहनचालक,पादचारी ,ग्रामस्थात समाधांन व्यक्त होत आहे.
मळेवाड ते तिरोडा तिठापर्यंतच्या रस्ता खड्डे मुक्त करण्याचं काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


