सावंतवाडी : तालुक्यातील ग्रामपंचायत शेर्ले येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा’ लाभ घेतलेल्या लाभार्थी महिलांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानले. तसेच या कार्यक्रमासाठी गावातील अनेक महिला उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित सरपंच प्रांजल प्रशांत जाधव, ग्रामपंचायत सदस्य शामराव सावंत, ग्रामसेवक राजन नाईक, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ मंडळी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांना सरपंच प्रांजल प्रशांत जाधव यांनी मार्गदर्शन केले. ग्रामसेवक राजन नाईक यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
शेर्ले येथे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


