सावंतवाडी : येथील श्री चंद्रकांत घाटे मित्र मंडळ व श्री सद्गुरु संगीत विद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १० मे रोजी ज्येष्ठ हार्मोनियम व ऑर्गनवादक स्वर्गीय पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यात नांदी ऑर्गनवादन एच. बी. सावंत, समूह हार्मोनियम वादन श्री सद्गुरु संगीत विद्यालयाचे विद्यार्थी, सोलो हार्मोनियम वादन चंद्रकांत घाटे, हार्मोनियम जुगलबंदी निलेश मेस्त्री व मंगेश मेस्त्री हे सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला तबला साथ नीरज भोसले, सोहम मेस्त्री, ज्ञानेश नाईक व चैतन्य सुतार करणार आहेत. तसेच कार्यक्रमाचे निवेदन संजय कात्रे व कुमारी गौरवी घाटे करणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा संगीत प्रेमी व सावंतवाडीकर नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
AADVT –
डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!


