वेंगुर्ला : आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ले विद्यालयाने घवघवीत यश मिळवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे तथागत बुक्स आयोजित भांगजी खंडू अल्हाट मराठी, हिंदी ,इंग्रजी आणि पाली या चार भाषेमध्ये ही आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा घेण्यात आली.
मराठी भाषेतुन जवळपास 953 स्पर्धेक या निबंध स्पर्धेत सहभागी झाले होते.
या मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा, वेंगुर्ले विद्यालयाची इयत्ता आठवीतील कु.प्राजक्ता अनिल भोकरे हिने प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला तर व्दितीय क्रमांक याच विद्यालयाची इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी कु.वैभवी सुदेश चिपकर तर या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक कु्.सोहम सुहास टेमकर या प्रशालेच्या नववीतील विद्यार्थ्यांने पटकावले.
या प्रथम तिन विजेत्या स्पर्धकांना सन्मान पत्र धनादेश आणि पुस्तके देऊन गौरविण्यात येणार आहे.
या आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या व विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांना न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ले विद्यालयाचे लिपिक अजित केरकर आणि या प्रशालेचे उपक्रमशील अध्यापक, लोककला अभ्यासक, निवेदन तथा मुलाखतकार प्रा.वैभव खानोलकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.
सर्व विजेत्यांचे आणि त्याचे पालक तसेच मार्गदर्शन श्री. अजित केरकर आणि श्री.वैभव खानोलकर यांचे विशेष अभिनंदन न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री विरेंद्र कामत आडारकर उपाध्यक्ष निवृत्त गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर, सचिव रांगोळीकार रमेश नरसुले, सदस्य निलेश मांजरेकर आणि इतर सर्व संस्था पदाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती, पालक संघ यांनी केले असुन
या आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धेत घवघवीत यश मिळवणारे प्राजक्ता भोकरे, वैभवी चिपकर, सोहम टेमकर यांना सह मार्गदर्शन करणारे उपक्रमशील अध्यापक वैभव खानोलकर यांच्यासह लिपिक अजित केरकर व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक यांचेही विशेष अभिनंदन केले आहे. सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत यश मिळवणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाचे या आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून या विद्यार्थ्यांचे आणि न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ले विद्यालयाचे अभिनंदन होत आहे.
ADVT –
📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇


