Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

भारताने हवेतच राख केलेलं पाकिस्तानच फतेह -1 बॅलेस्टिक मिसाइल किती खतरनाक ?

नवी दिल्ली : पाकिस्तानने शुक्रवारी रात्री भारताच्या एका रणनितीक लोकेशनवर Fatah-1 मिसाइल डागण्याचा प्रयत्न केला. हे स्थान सुरक्षा कारणांमुळे सार्वजनिक करण्यात आलेलं नाही. या हल्ल्यामुळे आधीपासून तणावपूर्ण असलेली स्थिती आणखी बिघडली आहे. पाकिस्तानने डागलेली मिसाइल भारताच्या एअर डिफेन्सने हवेतच नष्ट केली. त्याचा ढिगारा सुद्धा मिळाला आहे. पाकिस्तानच्या या Fatah-1 मिसाइलबद्दल इतकी हाइप का आहे? यामुळे किती नुकसान होऊ शकतं? ते जाणून घेऊया.

Fatah-1 मिसाइल एक शॉर्ट रेंज बॅलेस्टिक मिसाइल आहे. पाकिस्तानच हे स्वदेशी बनावटीच मिसाइल आहे. याची रेंज 150 किलोमीटर आहे. याचं Advance वर्जन Fatah-II आहे. याची रेंज 400 किलोमीटरपर्यंत आहे. या मिसाइलची स्ट्रायकिंग पावर अत्यंत अचूक मानली जाते. भारताच्या महत्त्वाच्या ठिकाणांना या क्षेपणास्त्रामुळे धोका निर्माण होऊ शकतो.

Fatah मिसाइल उत्पादनाचा खर्चही कमी आहे. कमी उत्पादन खर्च, अत्याधुनिक दिशा मार्गदर्शन प्रणाली आणि फ्लाइट कंट्रोल टेक्नोलॉजी यामुळे सध्याच्या एअर डिफेन्स सिस्टिमला आव्हान देण्याची क्षमता फतेह मिसाइलमध्ये आहे. पाकिस्तान आर्मीच्या दाव्यानुसार, ही मिसाइल 10 मीटरच्या आत आपला लक्ष्यभेद करु शकते.

S-400 साठी फतेहची निर्मिती –

भारताच्या सुरक्षा सिस्टिमला भेदण्यासाठी आम्ही Fatah मिसाइल बनवल्याच पाकिस्तानकडून सांगण्यात येतं. पाकिस्तानने Fatah-II मिसाइल खासकरुन रशियाच्या S-400 एअर डिफेन्स सिस्टिमला चकवा देण्यासाठी विकसित केलं आहे. ही मिसाइल S-400 सारख्या मोबाइल टार्गेटसलाही लक्ष्य करु शकते. आतापर्यंतच्या लढाईत S-400 मिसाइल सिस्टिमच भारताच अभेद्य सुरक्षा कवच ठरली आहे.

अत्याधुनिक आणि खतरनाक शस्त्र –

पाकिस्तानी सैन्याने मे महिन्यात Fatah-II ची यशस्वी चाचणी केली होती. हे पाकिस्तानच खूपच अत्याधुनिक आणि खतरनाक शस्त्र आहे. या क्षेपणास्त्राच्या चाचणीची पाकिस्तानने अधिकृत स्टेटमेंट जारी करुन माहिती दिली होती. भारताने सध्या फेतह मिसाइलचा हल्ला परतवून लावलाय. पण यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये तणाव आणखी वाढू शकतो. शुक्रवारी रात्री पाकिस्तानी आर्मीने भारताने बॅलेस्टिक मिसाइल डागल्याचा दावा केला. 6 महत्त्वाच्या लोकेशन्सवर या बॅलेस्टिक मिसाइल्सने लक्ष्यभेद केला.

ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles