धुळे : तालुक्यातील नगाव येथील प्रगतीशील आदर्श शेतकरी सुरेश दामू भदाणे (पाटील) यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक २३ ऑगस्ट रोजी निधन झाले. ठाणे पोलीस दलातील हवालदार शशिकांत भदाणे, युवा प्रगतीशील शेतकरी रणजीत भदाणे यांचे ते वडील होते. तर सेवानिवृत्त लिपिक भास्कर भदाणे, सेवानिवृत्त शिक्षक नगराज भदाणे यांचे ते बंधू होते. वाघाडी येथील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक भेरुलाल पाटील यांचे ते काका होते. दुपारी ३ वाजता त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात नगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, भाऊ, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
नगाव गावातील एक प्रामाणिक व कष्टाळू प्रगतीशील शेतकरी हरपल्यामुळे सर्व समाज स्तरावरून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


