Sunday, November 9, 2025

Buy now

spot_img

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या गुणवंतांचा संस्थेकडून स्नेहसत्कार !

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स् इंग्लिश स्कूलने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्तुंग यश संपादित करून 100% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत पुनः एकदा शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
कु मानसी मिलेश मालजी हिने 96.60% प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला तर कु.आयुष जितेष वेंगुर्लेकर याने 95.40% मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर कु. पियुषा उमाजी राणे हिने 94% संपादित करून तृतीय क्रमांक पटकावला.तसेच कु. यश विष्णू देसाई 93.60% , कु.पुर्वा प्रवीण देसाई 91.60%, कु.त्रिशा कांडरकर 90.80, कु भुषण मडगावकर 90.80, कु.रमेश कोठावळे 89.40%यांनी देखील नेत्रदीपक यश संपादित केले.या सर्व यशवंत विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दिनांक 16-05-2025 रोजी संस्थेच्यावतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त युवराज लखमराजे भोंसले, सहाय्यक संचालक अॅड. शामराव सावंत, सदस्य श्री जयप्रकाश सावंत व डॉ. सतीश सावंत तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर व शिक्षकवर्ग उपस्थित होता.सर्व मान्यवरांनी उपस्थित गुणवंतांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles