सावंतवाडी : कृषी सहायक संघटना शाखा सावंतवाडी यांच्या वतीने कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी कृषी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यकांनी यात सहभाग घेतला होता.
कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यात त्यांच्या विविध मागण्यांचे कडे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी सकाळी ११:०० वाजल्यापासून कृषी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते.शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर दिनांक १५ मे पासून कृषी सहाय्यक बेमुदत संपावर गेले आहेत.
कृषी सेवक पद रद्द करून कृषी सहाय्यक अधिकारी या पदावर थेट निवड करण्यात यावी. कृषी सहाय्यक आला डिजिटल काम असल्यामुळे लॅपटॉप देण्यात यावा. ग्राम स्तरावर कृषी सहाय्यकांना कृषी मदतनीस देण्यात यावा. निविष्ठा वाटप करताना सुसूत्रता आणावी यासाठी कृषी सहाय्यकांना वाहतूक भाड्याची तरतूद करावी. अन्यथा खरीप हंगाम २०२५ च्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. कृषी विभागाच्या आकृतीबंधास तात्काळ मान्यता द्यावी. सिसायक संवर्गाच्या आस्थापन विषयक अडचणीची सोडवणूक करण्यात यावी यासह विविध मागण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.