सावंतवाडी : आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे नेतृत्व करणारे शिंदे शिवसेनेचे युवा नेते दिनेश गावडे यांनी काल काड सिध्देश्वर मठात राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदें यांनी चौकुळ गावचा कबुलायतदार गावकर प्रश्न लवकरच निकाली निघेल, असे आश्वासन दिले.
आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघात गेली पंधरा वर्षे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करीत असलेले शिंदे शिवसेनेचे शिलेदार दिनेश गावडे यांनी आंबोली चौकुळ गावच्या विविध प्रश्रासंबंधी उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे कोल्हापूर कणेरी मठात मठाची पहाणी व काडसिध्देश्र्वर महाराजांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून हा प्रश्र लवकरात निकाली काढू, असे आश्वासन दिले.
यावेळी काड सिध्देश्वर स्वामी मठाचे ऋषीकेश पाटील व भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.



