Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

एका बाईसाठी दोन मंत्री भिडले ! ; सरकामध्ये भूकंप, नेमकं प्रकरण काय?

ढाका : बांगलादेशमधून मोठी बातमी समोर येत आहे, एका महिलेसाठी दोन मंत्री आपसात भिडल्याचं पाहायला मिळत आहे. नुसरत फारिया असं या महिलेचं नाव आहे. या महिलेच्या अटकेनंतर बांगलादेशच्या नव्या सरकारमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती एवढी गंभीर बनली आहे की, या महिलेसाठी थेट दोन मंत्री आमने-सामने आले आहेत. हे दोन्ही मंत्री डॉ.मुहम्मद युनूस यांचे निकटवर्ती असल्याची माहिती समोर येत आहे.

जुलै महिन्यात बांगलादेशमध्ये मोठं आंदोलन झालं होतं, या आंदोलनामध्ये या महिलेनं एका व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न केला असा तिच्यावर आरोप आहे, याच आरोपाखाली तिला अटक करण्यात आली आहे. मात्र आता या महिलेच्या अटकेवरून बांगलादेश सरकारचे दोन मंत्री आमने-सामने आले आहेत. नुसरत फारियाला रविवारी ढाकाच्या हजरत शाहजलाल अंतराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली, तिच्यावर जुलै महिन्यात झालेल्या आंदोलनावेळी एका व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. ती बांगलादेशहून थायलंडला जाण्यासाठी निघाली असताना तिला विमानतळावरच अटक करण्यात आली. मात्र आता या महिलेच्या अटकेनंतर बांगलादेश सरकारमध्ये वादळ आलं आहे.

नुसरतच्या अटकेनंतर लगेचच, सांस्कृतिक व्यवहार सल्लागार मुस्तफा सरवर फारुकी यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत या घटनेचा निषेध केला होता. ही घटना लज्जास्पद असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. जुलैमध्ये देशात जे बंड झालं त्याचा संबंध या महिलेशी जोडला जात आहे, मात्र पूर्णपणे आरोप सिद्ध होईलपर्यंत एखाद्याला अटक करणं हे चुकीचं आहे, असं फारुकी यांनी म्हटलं होतं.

फारुकी यांच्या या पोस्टमुळे बांगलादेशचे दोन मंत्री आमने-सामने आले, एकाने फारुकी यांना समर्थन देताना ही अटक चुकीची असल्याचं म्हटलं तर दुसऱ्यानं मात्र या अटकेचं समर्थन केलं, त्यामुळे त्यांच्यात चांगलाच वाद निर्माण झाला. हो दोन मंत्री आपसात भिडल्याचं पाहायला मिळालं. जोरदार वाद -प्रतिवाद झाला. हे प्रकरण एवढं लांबलं की, यामुळे सरकारमध्ये वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles