‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवात ४ जणांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ तर २० जणांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार!

* हिंदु राष्ट्ररत्न : आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड, डॉ. सच्चिदानंद शेवडे.
* सनातन धर्मश्री : आमदार टी. राजा सिंह, अधिवक्ता विष्णु जैन, प्रमोद मुतालिक.

फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) : सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवात हिंदु धर्मजागृती आणि राष्ट्ररक्षणासाठी कार्य करणार्‍या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या शुभहस्ते हस्ते ४ जणांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’, तर २० जणांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या वेळी कार्यक्रमाला २३ देशांतील २० हजारांहून अधिक साधक आणि हिंदू धर्मप्रेमी उपस्थित होते. या प्रसंगी व्यासपीठावर सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती होती.
या प्रसंगी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस म्हणाले, “देशात विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांना ‘पद्म’ ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ पुरस्कार दिले जातात; मात्र हिंदु धर्मासाठी जीवन समर्पित करून कार्य करणार्‍यांना अद्याप कोणताही सन्मान दिला जात नाही. ही पोकळी भरून काढण्यासाठी सनातन संस्थेने हा पुरस्कार आरंभला आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी हे पुरस्कार दिले जातील.”
उत्तरप्रदेश येथील आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड, बांगलादेश येथील ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक पू. अधिवक्ता रवींद्र घोष, कर्नाटक येथील पंचशिल्पकार पू. काशीनाथ कवटेकर, महाराष्ट्रातील मुंबई येथील प्रख्यात प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे, यांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तर ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करणार्‍यांमध्ये भाग्यनगर येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह, काशी-मथुरा येथील मंदिरमुक्तीसाठी लढा देणारे सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु जैन, गोवा येथील घनपाठी आचार्य योगेश्वर बोरकर, गोवा येथील पंडित महामहोपाध्याय डॉ. देवदत्त पाटीलजी, कर्नाटक येथील श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक, कर्नाटक येथील ‘युवा बिग्रेड’चे मार्गदर्शक श्री. चक्रवर्ती सुलीबेले, दिल्ली येथील चाणक्य फोरमचे संपादक मेजर गौरव आर्यजी, दिल्ली येथील ‘सुदर्शन वाहिनी’चे प्रधान संपादक डॉ. सुरेश चव्हाणके, उत्तर प्रदेश येथील ‘प्राच्यम्’चे संस्थापक कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी, तामिळनाडू येथील हिंदू मक्कल कत्छी’चे संस्थापक श्री. अर्जुन संपथ, दिल्ली येथील ‘सेव कल्चर सेव भारत फाऊंडेशन’चे श्री. उदय माहुरकर, कर्नाटक येथील माजी अतिरिक्त महाअधिवक्ता अधिवक्ता अरुण श्यामजी, बेल्जियम येथील लेखक डॉ. कोएनराड एल्स्ट, ओडीसा येथील ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲण्ड कल्चरल हेरिटेज’चे श्री. अनिलकुमार धीर, दिल्ली येथील अग्नि समाजा’चे संस्थापक श्री. संजीव नेवर, दिल्ली येथील ‘सरयु ट्रस्ट’चे संस्थापक श्री. राहुण दिवाण, हरियाणा येथील विचारवंत श्री. नीरज अत्री, मुंबई येथील समाजसेवक तथा लेखक डॉ. अमित थडानी, इंडोनेशिया येथील ‘धर्मस्थापनम्’ फाऊंडेशनचे रस आचार्य पू. धर्मयशजी महाराज आणि छत्तीसगड येथील श्री. प्रबल प्रतापसिंग जुदेव यांचा समावेश आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles