सावंतवाडी : भटवाडी गोविंद चित्र मंदिर येथील गेले महिनाभर रडतखडत सुरू असलेले गटार काम तत्काळ सुरू करण्यासाठी संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली व कुणाल शृंगारे यांच्या सह नागरिकांनी
नगरपरिषद अधिकारी व संबंधित ठेकेरादाला जाब विचारण्यात आला. यावेळी आज रात्रीपासून काम सुरू करण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली.तसेच या कामाच्या जागेत असलेले दोन गंजलेले वीज पोल एका दिवसात बदलून देण्याचे आश्वासन वीज महावितरण कंपनीचे उप अभियंता शैलेश राक्षे यांनी दिले त्यांनी यावेळी घटनास्थळाला भेट देऊन भाजपाच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले
यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, माजी नगरसेवक आनंद नेवगी, शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेवक उदय नाईक, माजी नगरसेवक सुनील पेडणेकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर दिलीप भालेकर बंड्या भिसे
प्रथमेश पेडणकर विजय सावंत विजय मुद्राळे हर्ष पेडणेकर गौरव रामाने मुन्ना तूयेकर बंड्या परब संतोष खंदारे संदेश मोर्ये नंदू खंदारे,साईराज सुभेदार, भरत परब, प्रसाद परब आदी उपस्थित होते.
भटवाडी येथे बंदिस्त गटाराचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. अतिशय संथगतीने हे काम सुरू आहे. गेल्या आठ दिवसांपासून तर काम पूर्णतः बंद करण्यात आले आहे. खोदकाम केल्यामुळे याठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कुणाल शृंगारे यांच्यासह सहकाऱ्यांनी सोमवारी नगरपालिका अधिकाऱ्यांना बोलावून घेत गटाराचे काम मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. हे काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन ठेकेदार नाईक यांच्याकडून देण्यात आले.
१५ दिवसांपूर्वी माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांची ही धडक
भटवाडी गोविंद चित्र मंदिर येथील गटार बांधकाम गेली वीस दिवस रखडले होते भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नगरपरिषद अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांना एकत्र करून गटार बांधकाम त्वरित सुरू करण्यास सांगितले
गेली पंधरा-वीस दिवस हे बांधकाम खोदाई सुरू केली दोन ते तीन दिवसात लवकरात लवकर करतो असे कॉन्टॅक्टरणे सांगितले होते तरी त्यास पंधरा-वीस दिवस उलटून गेले याचा नागरिकांना नाहक त्रास होत होता याची दखल घेत माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी तुषार सरडे मनोज राऊळ प्रदीप कशाळीकर कॉन्ट्रॅक्टर नाईक यांना एकत्र करून गटार बांधकाम त्वरित सुरू करण्यास सांगितले यावेळी भटवाडीतील नागरिक हर्षवर्धन धारणकर इत्यादी उपस्थित होते त्यानंतर एक दोन दिवस काम सुरू झाले मात्र सद्यस्थितीमध्ये खोदकाम करून धोकादायक स्थिती गटाराचा चर खोदून ठेवण्यात आला होता