मुंबई : महाराष्ट्र सरकारने नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शासनाने मोजणी शुल्कात मोठी कपात केली आहे. आता केवळ २०० रुपयांमध्ये जमिनीची हिस्सेवाटप मोजणी होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे जोरदार स्वागत केले जात आहे. यामुळे शेतीची, जमिनीची मोजणी आणि हिस्सेवाटप कमी खर्चात होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आता केवळ २०० रुपयांत जमिनीची हिस्सेवाटप मोजणी करता येणार आहे. महाराष्ट्र शासनाने मोजणी शुल्कात मोठी कपात केली आहे. फक्त २०० रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशे देण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. यापूर्वी हिस्सेमोजणी शुल्क एक हजार ते चार हजार रुपये प्रति हिस्सा असे आकारण्यात येत होते. आता मात्र फक्त २०० रुपयात हे काम होणार आहे. यापुढे शेतजमीन हिस्सेवाटप मोजणी कमी खर्चात कपात होणार असल्यामुळे शेतकऱ्यांसह राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
…………………………………….
ADVT –
📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇


