सावंतवाडीत उद्या पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘मोफत आरोग्य शिबीर’ ; सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, रोटरी क्लब यांचे संयुक्त आयोजन, SSPM मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, पडवे यांचे सहकार्य.

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल पडवे यांच्या सहकार्याने पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘मोफत आरोग्य शिबीर’ उद्या शुक्रवार, दिनांक २३ मे रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत साधले मेससमोरील रोटरी क्लब हॉल, सावंतवाडी येथे होणार आहे.
या शिबिरात एस.एस.पी.एम. हॉस्पिटलमधील नामांकित वैद्यकीय तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. यामध्ये अस्थिरोग तज्ज्ञ तथा त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सुधीर सांभारे, दंतरोग तज्ज्ञ डॉ. ऐश्वर्या जगताप, तसेच किडनी विकार तज्ज्ञ डॉ. प्रकाश घोगळे यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथकही शिबिरात सेवा देणार आहे.
या आरोग्य शिबिरात सहभागी होणाऱ्यांना सामान्य तपासणी, रक्तदाब मोजणी, ईसीजी (ECG) तपासणी यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील. तसेच, हिंद लॅबच्या माध्यमातून रक्त तपासणीची सुविधाही पुरवण्यात येणार आहे, ज्यामुळे विविध आजारांचे निदान वेळेत होण्यास मदत होईल. तरी सर्व पत्रकार बांधव व कुटुंबियांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, सचिव विजय राऊत, खजिनदार रामचंद्र कुडाळकर व सर्व सदस्यांनी केले आहे.


ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles