सावंतवाडी : पदवीधर प्रकोष्ठ ,भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य ऑनलाईन राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
“धर्म, करुणा आणि कर्तृत्वाचे प्रतीक म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर!”
केवळ एक राजमाता नव्हे, तर समाजहितासाठी झटणारी एक जागृत सेविका होत्या त्या. काशीपासून रामेश्वरापर्यंत त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी आणि धर्मशाळांची उभारणी केली – त्या केवळ इमारती नव्हत्या, तर संस्कृतीच्या आधारस्तंभ होत्या.
त्यांच्या कार्याचा विस्तार हा केवळ राज्यकारभारापुरता मर्यादित नव्हता, तर त्यात धर्म, न्याय, आणि मानवसेवेचे मूल्य होते. अशा या आदर्श स्त्रीशक्तीला आज आपण मानाचा मुजरा करतो कारण अहिल्याबाई म्हणजे दिव्यतेची आणि नेतृत्वाची जिवंत मूर्ती!
याच दिव्यत्वाला नमन करण्यासाठी त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी पदवीधर प्रकोष्ठ च्या वतीने भव्य अशा राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेची वैशिष्ट्ये –
१. भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
२. मराठी, हिंदी आणि इंग्रजी ही तिन्ही माध्यम
३. भव्य दिव्य पारितोषिके
४. सर्व सहभागींना सहभागीत्व प्रमाणपत्र
५. सर्व वयोगटांना संधी
६. कोणत्याही स्पर्धकाला केवळ एकाच स्पर्धेत भाग घेता येईल.
महत्त्वाच्या तारखा
१. दि.२५ मे ते ३० मे २०२५ – नाव नोंदणी आणि दिलेल्या लिंक वर निबंध स्पर्धेचे पीडीएफ पाठविणे.
२. दि. ०५ जून २०२५ पदवीधर प्रकोष्टाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर
३. पारितोषिक वितरणाची तारीख विजेत्यांना कळविण्यात येईल आणि सहभागीना ३० जून २०२५ च्या आत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.
नाव नोंदणीसाठी लिंक –
https://forms.gle/1nQxtXzF93zs3tpQ6
अधिक माहितीसाठी संपर्क –
9821704350, 9082528568,
80827 62162


