Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

श्री देव मायापूर्वचारी व पंचायतन आणि परिवार देवतांचा २ जूनपासून पुनःप्रतिष्ठापना सोहळा ! ; २ ते ५ जून दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन.

सावंतवाडी: मळगाव गावचे ग्रामदैवत श्री देव मायापूर्वचारी व पंचायतन आणि परिवार देवतांच्या मूर्तींचा पुनःप्रतिष्ठापना सोहळा सोमवार २ जून ते गुरुवार ५ जून या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या पवित्र धार्मिक सोहळ्यात सर्व ग्रामस्थ, माहेरवाशिणी, देणगीदार आणि भाविक भक्तगणांनी उत्साहात सहभागी होऊन महासोहळ्याची शोभा वाढवावी, तसेच दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मानकरी आणि ग्रामस्थ सोनुर्ली-मळगाव यांनी केले आहे.

चार दिवसीय धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा –
सोमवार, २ जून : प्रायश्चित्त विधी
सकाळी देवाला नारळ ठेवणे, देवांची संमती घेणे, प्रायश्चित्त, केशवपन, पंचगव्य होम, पंचगव्य प्राशन, प्रायश्चित्त विधान, महाप्रसाद आणि सांगता.

मंगळवार, ३ जून: तत्त्वोद्धार विधी
सकाळी पुण्याहवाचन, संभारदान, मधुपर्क, आचार्यादि ब्राह्मण वरण, स्थलशुद्धी, अज्ञोरहोम, देवांची महापूजा, तत्वचालन होम, तत्वोद्धार, पूर्णाहुती, महाप्रसाद आणि सांगता.

बुधवार, ४ जून : श्री देव मायापूर्वचारी सपरिवार देवता अर्चाविधी
सकाळी स्थलशुद्धी, जलाधिवास, स्नानविधी, शय्याधिवास, पीठदेवता स्थापना, अग्निस्थापना, वास्तुयजन, ग्रहयजन, पर्याय होम, महाप्रसाद आणि सांगता.

गुरुवार, ५ जून : मुख्य प्रतिष्ठापना सोहळा
सकाळी स्थलशुद्धी, ७ वा. देव उठवणे, तत्वन्यासहोम, तत्वन्यास व प्राणप्रतिष्ठा, देवतांची महापूजा, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, आरती, मंत्रपुष्प, गाऱ्हाणे (सामुहिक प्रार्थना), ब्राह्मण पूजन, महाप्रसाद आणि सांगता.

या सोहळ्यात सहभागी होऊन भाविकांनी पुण्यसंचय करावा आणि श्री देव मायापूर्वचारी व परिवार देवतांचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन मानकरी आणि ग्रामस्थ सोनुर्ली मळगाव यांनी केले आहे.

ADVT –

डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles