Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

सिंधुदुर्गनगरी येथे पाच एकर जागेत साकारणार बायोपार्क ! ; मानव साधन विकास संस्थेचे शाश्वत विकासाच्या दिशेने आणखीन एक पाऊल.

सिंधुदुर्गनगरी : पंचवीस वर्षांपूर्वी देशाचे माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुरेश प्रभू यांनी कोकणच्या शाश्वत विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मानव साधन विकास संस्थेची स्थापना केली. मानवाकडे असलेल्या उपजत कलागुणांचा आणि श्रमशक्तीचा वापर करून विविध क्षेत्रात खऱ्या अर्थाने रचनात्मक काम करून त्या घटकांचा सर्वागीण विकास करावा, हे या संस्थेचे मुख्य ध्येय.
मानव साधन विकास संस्थेचा गेल्या पंचवीस वर्षाचा प्रवास हा ही संस्था प्रसिद्धीपासून दूर राहिल्याने लोकांसमोर हे काम आलेले नाही. मानव साधन विकास संस्थने अणाव येथे नर्सिंग काॅलेज सुरू केल्याने गरजू व होतकरू मुलींना आपले शिक्षण जिल्ह्यातच पूर्ण करता आले. या नर्सिंग काॅलेजच्या माध्यमातून आतापर्यंत पाचशेपेक्षा जास्त मुलीनी पदवी घेऊन मोठ्या शहरात प्लेसमेंट मिळवलेली आहे. गेल्यावर्षीपासून फिजिओथेरपी हा विषय सुरू करण्यात आलेला आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारत सरकारच्या कौशल्य विकास मंञालया अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली पंचवीस वर्षे विविध घटकांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आतापर्यंत ऐंशी हजार लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला. चार वर्षापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातही जनशिक्षणची ही लोकाभिमुख चळवळ सुरू झालेली आहे.


परिवर्तन केंद्राच्या माध्यमातून मच्छिंमार, महिला, युवक, माजी सैनिक आणि शेतकरी या घटकांसाठी काम सुरू आहे. सेंद्रिय शेती या संकल्पनेला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आणि सह्याद्रीच्या पट्ट्यातील औषधी वनस्पतींचा शोध घेऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी व शेतीपूरक संकल्पना राबविण्यासाठी मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. उमा प्रभू यांच्या डोक्यात ही ‘बायोपार्क’ प्रकल्पाची कल्पना आली आणि त्या दिशेने प्रयत्न सुरू झाले. यासाठी सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणाने जनशिक्षणच्या ओरोस येथील प्रशासकीय इमारतीच्या समोरील पाच एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली. जगभरात हवामानातील झपाट्याने होणाऱ्या बदलांमुळे सर्वजण चिंतेत आहेत अशावेळी वनस्पती लागवड करणे आणि विशेषतः औषधी वनस्पती आणि त्यावर संशोधन करणे व रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करणे, हा या बायोपार्कचा मुळ उद्देश आहे.


जनशिक्षणच्या सभागृहात जिल्ह्यातील काही निवडक शेतकऱ्यांना आमंत्रित करुन या प्रकल्पाची शास्त्रीय माहिती देण्यात आली. या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी कर्नाटक व गोव्याचे इनकम टॅक्सचे तत्कालीन मुख्य आयुक्त (आयआरएस) पतंजली झा, आयआयटी मुंबईचे अरविंद जोशी यांनी या सर्व शेतकऱ्यांना मौल्यवान मार्गदर्शन केले. काळी हळद आणि शेवगा सारख्या औषधी वनस्पतींची लागवड करून परकीय चलन मिळवता येते. आपल्या निवृतीनंतर पतंजली झा यांनी बिहारमध्ये शेकडो एकरमध्ये ही लागवड केलेली असून काळी हळद ही कर्क रोगावर अतिशय प्रभावशाली आहे. यामुळे अनेक रूग्णाना दिलासा मिळाल्याचे त्यांनी उदाहरणास शेतकऱ्यांना सांगितले.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि सौ. उमा प्रभू यांनी मानव साधन विकास संस्थेचा हा नैसर्गिक संपदेला पूरक असा प्रकल्प असून शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन हा प्रकल्प राबविला जाणार आहे.
बायोपार्कची संकल्पना शेतकऱ्यांना समजावी यासाठी संपन्न झालेल्या या कार्यशाळेसाठी मानव साधन संस्थेच्या विश्वस्त सौ. अदिती सावंत, डॉ. शरद सावंत, जनशिक्षणचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, उपाध्यक्ष योगेश प्रभू, परिवर्तन केंद्राचे समन्वयक नंदकिशोर परब, जनशिक्षणचे माजी विश्वस्त अॅड. नकुल पार्सेकर, जनशिक्षणचे संचालक सुधीर पालव आदि मान्यवर उपस्थित होते. जिल्हाभरातून सर्व तालुक्यातून पन्नासहून अधिक उपक्रमशील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नंदकिशोर परब यांनी केले.

ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles