सावंतवाडी : दिनांक 30 मे 2025 रोजी कृषी विज्ञान केंद्र किर्लोस, तालुका कृषी अधिकारी सावंतवाडी यांचे संयुक्त विद्यमाने ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ अंतर्गत मौजे तांबोळी, कोणशी, विलवडे या गावात शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला तांबोळी गावच्या सरपंच श्रीमती नाईक, विलवडे गावचे सरपंच प्रकाश दळवी, कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे डॉ. विलास सावंत, डॉ. धामापूरकर, ‘आयसीएआर’चे किरण रसाळ, मंडळ कृषी अधिकारी बांदा युवराज भुईम्बर, कृषी पर्यवेक्षक छाया राऊळ, कृषी सहाय्यक मिलिंद निकम, श्रीमती पूनम देसाई, श्रीमती रसिका वसकर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमांमध्ये खरीप हंगाम नियोजन, भात लागवड पद्धती, सूर्यफूल लागवड, नाचणी लागवड, फळबाग लागवड, शेततळ्यामधील मत्स्य उत्पादन, खेकडा पालन इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांनी विचारलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. यावेळी तांबोळी गावातील शेतकऱ्यांना हळद कंदांचे बियाण्याचे वाटपही करण्यात आले.


