Sunday, June 22, 2025

Buy now

spot_img

विद्युत पुरवठा खंडित ठेवू नका ! : पालकमंत्री नितेश राणे यांचे सक्त निर्देश ; मंत्री नितेश राणे यांची विद्युत वितरणच्या नियंत्रण कक्षाला अचानक भेट !, नियंत्रण कक्षाच्या कामकाजात सुधारणा करण्याच्या दिल्या सूचना.

  • अधीक्षक अभियंता व अधिकाऱ्यांकडून घेतला कामाचा आढावा. 

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणाऱ्या विद्युत पुरवठ्या संदर्भात असलेल्या नागरिकांच्या तक्रारीसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाला पालकमंत्री नितेश आणि यांनी शुक्रवारी अचानक भेट दिली. यावेळी नियंत्रण कक्षाच्या कामकाजाची माहिती घेतली यामध्ये अनेक सुधारणा कराव्या लागतील, अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे अनेक गाव विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे काळोखात राहिल्या या घटनेची पालकमंत्री नितेश राणे यांनी गंभीर दखल घेऊन विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता यांना तात्काळ नियंत्रण कक्ष स्थापन करून यामध्ये आलेल्या नागरिकांच्या तक्रारी सोडवण्याच्या सूचना दिल्या दरम्यान हा कक्ष कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालय येथे उभारण्यात आला आहे आणि या कक्षामध्ये कशाप्रकारे काम चालू आहे याची माहिती घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी आज (शुक्रवारी) नियंत्रण कक्षाला भेट दिली. या कक्षामध्ये दाखल झालेल्या तक्रारी आणि त्यांचे किती तासाने निरासन झाले याची विचारणा करून तक्रारी असलेल्या पुस्तकाची पडताळणी केली तसेच ऑनलाईन असलेल्या तक्रारीची माहिती घेतली.
यावेळी कार्यकारी अभियंता वनमोरे यांना पालकमंत्री नितेश राणे यांनी सूचना केल्या या नियंत्रण कक्षाचे कामकाज अजून सुधारले पाहिजे आलेली तक्रार संबंधितांपर्यंत तात्काळ जाणे अपेक्षित आहे यामध्ये कोणताही विलंब होऊ देऊ नका तसेच तासान तास विद्युत पुरवठा खंडित राहू नये याकडे लक्ष द्या अशा सूचना दिल्या यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles