सावंतवाडी : राष्ट्रीय पातळीवर राबविण्यात येणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या पर्यावरण दिना निमित्ताने “एक झाड मातृभूमीसाठी” या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपा युवा नेते संदीप गावडे यांच्या आयोजनातून रविवार दिनांक ८ जून रोजी “Flower Valley At Kavalesaad Point” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमा अंतर्गत गेळे, येथे कावळेसाद पॉइंट तसेच तेथे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा सुमारे १०० झाडे लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी ०९:३० वाजता सुरु होईल. तरी या कार्यक्रमास पर्यावरण प्रेमी तसेच, सामाजिक कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडी तालुक्यातील कार्यकर्ते व आंबोली, गेळे, चौकुळ येथील ग्रामस्थ यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन युवा नेते संदीप गावडे यांनी केले आहे.


