संजय पिळणकर.
सावंतवाडी : तळकट- भटवाडी येथील विजयकुमार मराठे यांच्या घरासमोर आज दुपारी ३.०० च्या सुमारास सुमारे १४ फूट लांबीचा किंग कोब्रा नाग येथील अभिजीत देसाई यांना दिसून आला.
यावेळी त्या १४ फुटी किंग कोब्राला पकडण्यासाठी झोळंबे येथील सर्पमित्र विठ्ठल गवस यांना बोलविण्यात आले.त्यांनी तात्काळ त्यांच्या साथीदारांसह अथक परिश्रमाने कोब्राला पकडण्यात यश आले.यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी तळकट सरपंच सुरेंद्र सावंत भोसले,उपसरपंच रमाकांत गवस,माजी सरपंच रमेश शिंदे, अभिजीत देसाई,नारायण राऊळ, प्रज्योत देसाई,जोतिबा,अमोल मळीक,अकुश वेटे,वनविभागाचे कर्मचारी सुबोध नाईक,लाडु गवस आदींनी विठ्ठल गवस यांना किंग कोब्राला पकडण्यासाठी सहकार्य केले.