खुन्नसच्या संशयातून सावंतवाडीत तरुणावर हल्ला! ; एकावर गुन्हा दाखल.

सावंतवाडी : मागील भांडणाचा राग मनात धरून शेजारी राहणाऱ्या तरुणाने एका युवकावर लोखंडी शिगेने हल्ला केल्याची घटना सावंतवाडीतील बाहेरचा वाडा परिसरात घडली. या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उजेर इम्तियाज बेग (वय २२, रा. माठेवाडा, झिरंगवाडी – सावंतवाडी) याला त्याचा शेजारी अबुजर मुबिन बेग (वय १९ – रा. माठेवाडा, झिरंगवाडी – सावंतवाडी) याने मागील भांडणाचा राग मनात धरून अडविले. “माझ्याकडे खुन्नसच्या नजरेने का बघतोस?” अशी विचारणा करत आरोपीने संतापाच्या भरात फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्या डोक्यावर लोखंडी शिगेने वार करून मारहाण केल्याचा आरोप आहे.

या हल्ल्यात उजेर बेग जखमी झाला असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर गुरुवारी (ता. १८) रात्री उशिरा सावंतवाडी पोलिस ठाण्यात आरोपी अबुजर मुबिन बेग याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
या घटनेचा पुढील तपास सावंतवाडी पोलिस करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles