कविलकाटेकरांना मोठा दिलासा!, वर्षानुवर्षांचा ‘ग्रीन झोन’ हटला! – आमदार निलेश राणेंचे समिल जळवींकडून जाहीर आभार!

◼️ दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; नागरिकांच्या विकासाचा मार्ग मोकळा.

◼️ उर्वरित ग्रीन झोन हटविण्यासाठीही आमदार राणेंची ग्वाही.

कुडाळ : कुडाळ शहरालगतच्या कविलकाटे परिसरातील नागरिकांच्या विकासाला अनेक वर्षे अडसर ठरलेला ग्रीन झोन अखेर मोठ्या प्रमाणात हटविण्यात आला असून, यामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार समिल जळवी यांनी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांचे लेखी निवेदनाद्वारे जाहीर आभार मानले आहेत.

कविलकाटे नगरपंचायत हद्दीतील १ नंबर वॉर्डमधील शेतकरी व नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रमुख मागणी म्हणजे ग्रीन झोन हटविणे. या मागणीसाठी समिल जळवी यांनी गेली दोन वर्षे मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये सातत्याने पाठपुरावा केला. अनेक निवेदने, बैठका आणि माध्यमांमधून आवाज उठवून हा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून दिला.

मात्र अपेक्षित यश मिळत नसताना, आमदार निलेश राणे यांच्या निवडीनंतर या प्रश्नाला नवे बळ मिळाले. जळवी यांनी विविध स्वरूपातील लेखी निवेदने देत, वारंवार भेटी घेऊन हा विषय आमदार राणे यांच्या समोर मांडला. लोकसंवाद लाईव्ह न्यूजच्या माध्यमातूनही ग्रीन झोनचा मुद्दा सातत्याने लावून धरला गेला.

या सर्व प्रयत्नांची दखल घेत आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कविलकाटेतील बहुतांश ग्रीन झोन हटविण्याचा निर्णय झाला असून, त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या विकासाच्या आशा आता प्रत्यक्षात उतरू लागल्या आहेत.

🔥 नागरिकांमध्ये समाधान; उर्वरित भागासाठीही प्रयत्न सुरू

ग्रीन झोन हटल्यामुळे घरबांधणी, विकासकामे आणि मालमत्तेच्या वापरावरील अनेक मर्यादा दूर होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी समिल जळवी यांनी नागरिकांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचे विशेष आभार मानले.

आमदार राणे यांनीही उर्वरित काही भागांवरील ग्रीन झोन हटविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याची ग्वाही दिली आहे. तसेच ज्या नागरिकांच्या जमिनी अद्याप ग्रीन झोन किंवा बाधित झोनमध्ये आहेत, त्यांनी ८ जुलैपूर्वी नगरपंचायत कार्यालयात हरकती दाखल कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

💬 “नागरिकांच्या विकासाचा अडसर दूर झाला”

कविलकाटे परिसराला अनेक वर्षे वेढून राहिलेला ग्रीन झोन हटल्याने नागरिकांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. यापुढेही या भागातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत समिल जळवी यांनी कुडाळ येथील कार्यक्रमात आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन त्यांना आभारपत्र सादर केले.

कविलकाटेच्या विकासासाठीचा हा निर्णय ऐतिहासिक ठरत असून, स्थानिक नागरिकांसाठी नवी आशा आणि नव्या विकासपर्वाची सुरुवात मानली जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles