Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

मुंबई येथील व्यक्तीला हृदय विकाराचा झटका, सामाजिक बांधिलकीच्या सतर्कतेमुळे ‘अनर्थ’ टळला!

सावंतवाडी : मुंबईच्या विरार येथून संदीप विष्णू शिंत्रे (वय 55) हा  व्यक्ती सावंतवाडी व माणगाव येथील दत्त मंदिरांना भेट देण्यासाठी आला होता. काल रात्री 12 च्या दरम्याने त्यांच्या छातीमध्ये दुखत असल्यामुळे त्यांना एका व्यक्तीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले परंतु येथील डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले असता त्यांना हार्ट अटॅक आल्याचं डॉक्टर यांनी सांगितले व सदर पेशंटला लगेचच गोवा बांबुळी किंवा जिल्हा रुग्णालय ओरोस येथे दाखल करण्याचा सल्ला दिला परंतु सदर पेशंटचे कोणीही नातेवाईक नसल्यामुळे सदर पेशंटला जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याची जबाबदारी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी जबाबदारी स्वीकारली.

108 ला थोडा थोडा वेळ लागला असता ऑपरेशनला इमर्जन्सी जिल्हा रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होतं अशा वेळी सावंतवाडीच्या माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी आपली ॲम्बुलन्स तातडीने उपलब्ध करून दिली तर सावंतवाडी पोलीस स्टेशनचे बीट हवालदार पि. के कदम यांनी पेट्रोल खर्चासाठी पैसे दिले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे लक्ष्मण कदम व रवी जाधव यांनी स्वतः ॲम्बुलन्स वर ड्रायव्हिंग करून रात्री 1: 30 ला सदर पेशंटला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले असतात तेथील तेथील डॉक्टरांकडून त्यांच्यावर तातडीने उपचार करून त्यांचा जीव वाचवण्यात आला.


सदर पेशंटचे नातेवाईक मुंबईवरून आज दुपारपर्यंतर पोहोचतील अशी माहिती मिळाली तर सदर पेशंटचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.या बहुमूल्य सेवाभावी कार्यासाठी येथील डॉक्टर, सावंतवाडी पोलीस कर्मचारी पि.के कदम,अभिजीत कांबळे, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव लक्ष्मण कदम, व जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर यांचे सदर पेशंटने आभार मानले.
महिन्यापूर्वी रेल्वेतून सावंतवाडी ते मुंबई असा प्रवास करणारे फर्नांडिस नामक वृद्ध व्यक्तीला रेल्वेतच हार्ट अटॅक आला होता.

यासाठी तेथील प्रवाशांनी सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव यांच्या जवळ मदत मागण्यात आली होती अशावेळी रवी जाधव यांनी रेल्वे स्टेशन येथे तात्काळ ॲम्बुलन्स नेऊन पेशंटला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून गोवा बांबुळी येथे तात्काळ पाठवण्यात आले होते. त्यावेळी सुद्धा त्या पेशंटचा जीव वाचला होता व त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांचे आभार मानले होते. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजपर्यंत साठ पेशंटचे जीव वाचवण्यात आले आहेत, असे रवी जाधव म्हणाले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles