– अपघातग्रस्त शिक्षकांना उपचारासाठी काही कमी पडू देणार नाही! –: शिक्षण मंत्री दादा भुसे.
रत्नागिरी : चिपळूणमधील काही शिक्षक रत्नागिरीत प्रशिक्षणासाठी येत असताना निवळी येथे त्यांच्या ट्रॅव्हल्सला रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. एका गॅसवाहू टँकरने त्यांच्या ट्रॅव्हल्सला धडक दिली. यात जवळपास 22 ते 23 शिक्षक जखमी झाले आहेत, तर दोघे गंभीर आहेत. या सर्व शिक्षकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गॅसवाहू टँकर इतका सुसाट होता की, धडक दिल्यानंतर तो पलटी झाला. यामुळे गॅसची टाकी फुटली आणि त्यातून सुसाटगतीने गॅस बाहेर सांडू लागला. या गॅसगळतीमुळे दोन घरांनी पेट घेतल्याचीही घटना घडली आहे.
आज सकाळी चिपळूणवरुन रत्नागिरीकडे वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी जाणाऱ्या शिक्षकांच्या बसला अपघात झाला, आहे. त्यामध्ये अनेक शिक्षक गंभीर जखमी झालेले आहेत,अत्यंत दुर्दैवी अशी घटना असून , सदर घटनेची माहिती आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दिली आहे.
त्यांनी जखमी शिक्षकांना उपचारासाठी कुठे काही कमी पडू देणार नाही असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे.
तसेच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी सुद्धा संपर्क सुरू आहे.
“सर्वांनी काळजी करू नये , सर्व यंत्रणांशी बोलणे सुरू आहे.”, असं प्रशिक्षण घेणाऱ्या अनेक शिक्षकांशी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर फोनवरून बोललेले आहेत व त्यांना धीर दिलेला आहे.!”
— राजेश जाधव.
(अध्यक्ष – शिवछत्रपती शिक्षक संघटना रत्नागिरी जिल्हा)
– दरम्यान अनेक प्रशिक्षणार्थी शिक्षक गंभीर जखमी.
– प्रशासन प्रशिक्षणार्थींचे बळी घेणार काय?
– शिक्षण क्रांती संघटनेचा सवाल.
दरम्यान, अपघात व्हिडीओतील दृश्य विचलीत करणारी आहेत.
एक दिवस जरी प्रशिक्षणाला गैरहजर राहिलात किंवा हजेरी ॲानलाईन अपलोड केल्यानंतर पोहचलात तर संपूर्ण प्रशिक्षणातून बाद करण्याच्या संचालकांच्या फतव्याच्या भीतीमुळे आज सकाळी (८जून) चिपळूण वरून रत्नागिरी जाणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या मिनी बसचा मोठा अपघात झाला असून अनेक प्रशिक्षणार्थी त्यात गंभीर जखमी झाले आहेत.
प्रशिक्षणाकरीता ७५ टक्के हजेरी ग्राह्य धरण्याबाबत शिक्षण क्रांती संघटना सुरूवातीपासून आग्रही आहे. मात्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आपला १०० टक्के उपस्थितीचा हेका सोडायला तयार नाही.
प्रशिक्षणार्थी शिक्षकांचे बळी घेतल्यानंतर प्रशासन सवलत देणार आहे काय असा संतप्त सवाल शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष सुधीर घागस यांनी उपस्थित केला आहे.
जवळच्या नातेवाकाचे निधन, अकस्मात येणारे आजारपण, वाहतूक कोंडी, अपघात या गोष्टी सांगून येत नाहीत.
याकरीता प्रशिक्षणातील उपस्थिती १०० टक्के ऐवजी ७५ टक्के करण्याबाबत शिक्षण क्रांती संघटना आग्रही आहे.
संचालक ऐकत नसतील तर याबाबतचा शासन आदेश निर्गमित करावा असा पर्याय ही संघटेकडून सूचवण्यात आला आहे. मात्र कुणीही दाद देत नाही.
त्यामुळे मुकी बिचारी कुणीही हाका असे शिक्षकांबद्दल पुन्हा एकदा म्हणण्याची पाळी आल्याचे घागस यांनी सांगितले.