Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

५ जून २०२५ रोजीच्या शासन निर्णयाविरोधात, अंशकालीन शिक्षक धोरणाचा तीव्र निषेध! : अजय शिंदे यांची माहिती.

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र शासनाने दिनांक ५ जून २०२५ रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उच्च प्राथमिक वर्ग (इयत्ता ६ वी ते ८ वी) साठी अंशकालीन कला व क्रीडा शिक्षक पदे निर्माण करण्यात आली आहेत. परंतु, हे धोरण राज्यातील बेरोजगार, पात्र व प्रशिक्षित शिक्षक उमेदवारांवर अन्याय करणारे आणि शिक्षणाच्या दर्जावर घाला घालणारे आहे.

या धोरणानुसार शिक्षकांना केवळ ₹१५० प्रति तासाचे मानधन देण्यात येणार असून ४८ तासांचा कार्यभार, म्हणजेच प्रत्यक्षात पूर्णवेळ शिक्षकांचे काम, पण मानधन केवळ ₹१२,००० प्रतिमहिना इतकेच!

जर अर्धवेळ अंशकालीन सेवा दिली, तर फक्त ₹६,००० मिळणार! आजच्या महागाईच्या काळात हा पगार एका वेट बिगर कामगारापेक्षा कमी आहे — शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात शोकांतिका नाही का?
या अंशकालीन धोरणामुळे:
बेरोजगार शिक्षकांची फसवणूक होत आहे.
भरती प्रक्रिया अस्पष्ट व अपारदर्शक आहे.
शिक्षणाची गुणवत्ता धोक्यात येणार आहे.
आणि शासनाचा दुहेरी दृष्टिकोन उघड होतो आहे.

‘ह्या’ आहेत ठाम मागण्या:

1. ५ जून २०२५ चा अंशकालीन कला /क्रीडा शिक्षक संदर्भातील शासन निर्णय रद्द करून सुधारित अध्यादेश जाहीर करावा.

2. उच्च प्राथमिक शिक्षक पदे ‘पवित्र पोर्टल’ च्या माध्यमातून भरावी.

3. भरती प्रक्रिया पारदर्शक, न्याय्य व स्थिर रोजगार देणारी असावी.

राज्यभरातील सर्व प्रशिक्षित उमेदवार, शिक्षक संघटना, पालकवर्ग व शिक्षणप्रेमींनी या अन्यायकारक धोरणाविरोधात एकत्र येऊन आवाज उठवावा‌ अशी अपेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांनी व्यक्त केली आहे…

“शिक्षकांना अस्थैर्य नको – स्थायीत्व हवे!”
“अंशकालीन नव्हे, पूर्णवेळ शिक्षकांचीच गरज आहे!”
– शासनाच्या अंशकालीन कला /क्रीडा शिक्षक भरती धोरणाचा महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ तीव्र निषेध करत आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles