Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

जिल्हा गौड सारस्वत ब्राह्मण समाज सिंधुदुर्गतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न ! ; शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या समाजाचा गौरवयोग्य उपक्रम.

कुडाळ :  जिल्हा गौड सारस्वत ब्राह्मण समाज, सिंधुदुर्ग यांच्या वतीने कुडाळ येथील मराठा सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता दहावी व बारावी परीक्षांमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या समाजातील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

समारंभाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत नाडकर्णी, सचिव संतोष पई, कोषाध्यक्ष दिलीप कामत, कार्यकारणी सदस्य आणि समाजातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले मुख्य अतिथी प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. नारायण नाडकर्णी यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन. “शिक्षण ही केवळ गुण मिळवण्याची शर्यत नसून ते आयुष्यभर चालणारी सृजनात्मक प्रक्रिया आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना मेहनत, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या महत्त्वावर भर दिला.

या वेळी बोलताना अध्यक्ष चंद्रकांत नाडकर्णी म्हणाले, “समाजातील होतकरू विद्यार्थी हे आमच्या भविष्याचे आधारस्तंभ आहेत. त्यांना प्रोत्साहन देणे व त्यांच्या यशाचा गौरव करणे हे आमचे कर्तव्य आहे. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो व ते उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रेरित होतात.”

सचिव संतोष पई यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत समाजाच्या पुढील सहकार्याची ग्वाही दिली. समाजातील पालक, शिक्षक, विद्यार्थी व बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीए सौ. जयंती कुलकर्णी यांनी केले तर आभारप्रदर्शन संतोष पई यांनी केले.

हा गौरव समारंभ समाजातील शैक्षणिक जाणीवांमध्ये वाढ घडवणारा, एकोप्याला बळकटी देणारा व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. “अशा उपक्रमांमुळे समाजातील नव्या पिढीला पुढे जाण्याचा आत्मविश्वास मिळतो,” असे उपस्थितांनी सांगितले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles